Israel Iran War- मध्यपूर्वेतील युद्धात आत्तापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? आकडेवारी चिंताजनक

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे २८ फेब्रुवारीला इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे, मध्यपूर्वेतील हजारो नागरिक मारले गेले. दिवसागणिक हे युद्ध अधिक तीव्र होत आहे. दहा दिवस उलटल्यानंतरही, हे युद्ध सुरु आहे. सरकार, लष्कर, आरोग्य विभाग आणि बचाव संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीच्या आधारे, अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात १० दिवसांनंतर किती लोकांचा बळी गेला हे जाणून घेऊया.

इराण
इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या लढाईत १ हजार २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. यामध्ये अंदाजे २०० महिला आणि १२ वर्षांखालील २०० मुलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, १० हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. इराणच्या सरकारी फाउंडेशन फॉर मार्टर्स अँड वेटरन्स अफेयर्सने गुरुवारी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये मृतांची संख्या १ हजार २३० वर पोहोचली आहे. इराणी रेड क्रेसेंटने यापूर्वी ३ मार्चला ७८७ मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान अमेरिकास्थित मानवाधिकार कार्यकर्ते वृत्तसंस्था (HRANA) ने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, किमान १ हजार ७०८ लोक मारले गेले आहेत. यामध्ये १ हजार २०५ नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांमध्ये किमान १९४ मुले देखील आहेत. याशिवाय, १८७ लष्करी कर्मचारी आणि ३१६ इतर लोक ज्यांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही.

इस्रायल
इस्रायली बचाव कर्मचारी आणि सैन्याच्या मते, देशात झालेल्या लढाईत एकूण १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य करणाऱ्यांकडून समजते की, इराणने हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली. त्यानंतर इस्रायलमध्ये ११ लोक मारले गेले आहेत आणि डझनभर जखमी झाले आहेत. बेट शेमेश शहरावरील हल्ल्यात मृतांपैकी नऊ जणांचा मृत्यू झाला, ज्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या लढाईत त्यांच्या दोन सैनिकांच्या मृत्यूची घोषणाही केली.

लेबनॉन
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात झालेल्या हल्ल्यांमध्ये ४८६ लोक मारले गेले आणि १ हजार ३१३ जण जखमी झाले आहेत.

आखाती प्रदेश
आखाती अधिकाऱ्यांनी आणि युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांड (सेंटकॉम) च्या मते, इराणी हल्ल्यांना सुरुवात झाल्यापासून शेजारील देशांमध्ये २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक लोक लष्करी किंवा सुरक्षा दलांचे सदस्य होते, ज्यात ७ अमेरिकन सैनिकांचा समावेश होता. याव्यतिरिक्त १० नागरिक देखील मारले गेले.

इराक
इराणमधील इराण समर्थक मिलिशियाने सांगितले की, त्यांचे १६ सदस्य हवाई हल्ल्यात मारले गेले. त्यांनी हल्ल्यांसाठी इस्रायल आणि अमेरिकेला जबाबदार धरले आहे. इराकच्या स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments are closed.