Israel Iran War – हिंदुस्थान आमचा मित्र, हार्मुझ सामुद्रधुनीत त्यांच्या तेलवाहू जहाजांना ग्रीन सिग्नल; इराणचे संकेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्ध दुसऱ्या आठवड्यातही सुरू आहे. या युद्धामुळए जगभारत कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाला असून आखाती देशात तणावाचे वातावरण आहे. या सर्व तणावात इराणकडून हिंदुस्थानसाठी सकारात्मक संकेत मिळत आहे. आखातातील वाढत्या तणाव आणि सागरी सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर इराणने हिंदुस्थानला महत्त्वाचा संकेत दिला आहे. हिंदुस्थानातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी सांगितले आहे की, इराण हिंदुस्थानला महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्यासाठी पावले उचलू शकते. त्यामुळे हिंदुस्थानला इंधन टंचाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पत्रकारांशी झालेल्या संभाषणादरम्यान फताली यांनी याबाबतचे सकारत्मक संकेत दिले. हिंदुस्थानी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग दिला जाईल का असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले की हिंदुस्थान हा आमचा मित्र आहे आणि या संदर्भात लवकरच सकारात्मक घडामोडी अपेक्षित आहेत. इराणचे हे विधान पर्शियन आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. त्यामुळे त्याला महत्त्व आले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना हिरवा कंदील देण्याचे संकेत इराणने दिले आहेत. हिंदुस्थान आमचा मित्र आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील. पर्शियन आखातातील वाढत्या तणावादरम्यान, इराणने हिंदुस्थानला सकारात्मक संकेत दिला आहे. हिंदुस्थानातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी सांगितले की हिंदुस्थान आमचा मित्र आहे आणि त्यांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग दिला जाईल. सध्याच्या परिस्थिती पाहता त्यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जाते.

Comments are closed.