गाझा रिकामे करा पॅलेस्टिनींना आदेश

हमासवर शेवटचा घाव घालण्याची तयारी इस्रायलने केली आहे. तत्पूर्वी, गाझा शहर पूर्णपणे रिकामे करण्याचे आदेश इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना दिले आहेत. ’हमास’चे दहशतवादी गाझातील गगनचुंबी टॉवर तळ म्हणून वापरत असल्याने इस्रायल या टॉवर्सना लक्ष्य करत आहे. आतापर्यंत इस्रायलने 30 टॉवर उद्ध्वस्त केले असून आणखी 50 टॉवर नष्ट करण्याची योजना आखली आहे.
Comments are closed.