Israel Iran War – इराणमध्ये मिनाबमधील शाळेवर हवाई हल्ला, 36 विद्यार्थ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पश्चिम आशियातील तणाव आता शिगेला पोहोचला असून इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर मोठा लष्करी हल्ला चढवला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये एकामागून एक झालेल्या स्फोटांच्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या कारवाईला इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी अधिकृतपणे दुजोरा दिला असून, इराणच्या विविध ठिकाणांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या युद्धाच्या भीषणतेत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या मिनाब शहराचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील एका शाळेला लक्ष्य करण्यात आले असून, या दुर्दैवी घटनेत 36 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, इराणनेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. इराणच्या या प्रतिहल्ल्यामुळे इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजत असून नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांमधील हा संघर्ष आता युद्धाच्या छायेत असून परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

Comments are closed.