इस्त्राईलचे राजदूत धन्यवाद भारत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिका आणि इस्रायलने सज्ज केलेल्या गाझा शांती योजनेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इस्रायलचे भारतातील राजदूत रेऊव्हेन अझार यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला अत्यंत शीघ्रगतीने प्रतिसाद दिला आहे. आमचे विचार यासंबंधात जुळतात हे यावरुन स्पष्ट होत आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी बनविलेल्या योजनेला हमासचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल काय हे अद्याप स्पष्ट नाही. तशी हमी आम्ही देऊ शकत नाही. हमासची प्रतिक्रिया लवकरच स्पष्ट होईल. मात्र, शांतीयोजनेचे नवे प्रारुप आजवरच्या इतर कोणत्याही प्रारुपापेक्षा भिन्न आहे. नव्या योजनेची दिशा आणि संकल्पना अधिक स्पष्ट आहे. या योजनेत गाझा आणि आसपासच्या प्रदेशात स्थायी शांतता रहावी, यासाठीचे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे ही योजना अधिक सविस्तर, अधिक व्यापक आणि अधिक सखोल आहे, अशी भलावण त्यांनी केली. तसेच गाझा युद्ध थांबल्यानंतर गाझाच्या विकासामध्ये भारतालाही मोठा सहभाग घेण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Comments are closed.