इस्रायलमध्ये अराजक; युद्धाविरोधात जनता रस्त्यावर
इराण विरुद्धच्या युद्धात मार खावा लागत असल्याने इस्रायलमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. राजधानी तेल अवीव येथे संतप्त जनता रस्त्यावर उतरली आहे. अनेक ठिकाणी आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. लोक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्धाला विरोध असलेली जनता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर धडकली असून तिथे निदर्शने सुरू आहेत. अक्षरशः अराजकी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवाई यंत्रणेवर इराणचा प्रहार
इस्रायलच्या हवाई हल्ल्याचे व्यवस्थापन करणाऱया आणि हल्ल्याशी संबंधित निर्णय घेणाऱया सर्व केंद्रांना इराणने ’ऑपरेशन ट प्रॉमिस 4’ अंतर्गत लक्ष्य केले आहे. त्यामुळे इस्रायलची हवाई हल्ल्यांची क्षमता प्रचंड कमकुवत झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी चीन, ब्रिटन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया इत्यादी देशांनी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. मात्र, त्यास कोणीही प्रतिसाद दिला नाही.
हिजबुल्लाचा इस्रायलच्या वर्मावर घाव
इराणच्या बाजूने लढणाऱया हिजबुल्ला संघटनेने इस्रायलच्या वर्मावरच घाव घातला आहे. उत्तर इस्रायलमध्ये असलेल्या योडीफाट मिलिट्री इंडस्ट्रीजवर हिजबुल्लाने मिसाईल हल्ले केले आहेत. योडीफाट इंडस्ट्री हे इस्रायलच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र उत्पादनांचे प्रमुख केंद्र आहे. हवाई हल्लाविरोधी यंत्रणेची निर्मितीही याच केंद्रावर केली जाते. ह्या केंद्रालाच हिजुबल्लाने लक्ष्य केले आहे. तेहरान टाइम्सने हा व्हिडिओ जारी केला आहे.
Comments are closed.