स्पेस, आपत्तीवर इस्रो हेड आंतरराष्ट्रीय सनद

6 महिन्यांचा राहणार कार्यकाळ

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारतीय अंतराळ संस्थेला (इस्रो) ‘अंतराळ, आपत्ती आंतरराष्ट्रीय चार्टर’च्या प्रमुखपदी निवडले गेले आहे. इस्रो 6 महिन्यांपर्यंत या भूमिकेत राहणार आहे. इस्रोचा हा कार्यकाळ एप्रिल 2025 पासून सुरू झाला आहे. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटरमध्ये 14-17 एप्रिल या कालावधीत चार्टरची 53 वी बैठक पार पडली. या बैठकीतच इस्रोला आंतरराष्ट्रीय चार्टरचा प्रमुख म्हणून निवडण्यात आले आहे. या बैठकीत जगातील आघाडीच्या अंतराळ संस्थांचे प्रतिनिधी सामील झाले. 22 विदेशी प्रतिनिधी या बैठकीत भाग घेण्यासाठी हैदराबाद येथे पोहोचले होते. भारत चार्टरवर स्वाक्षरी करणारा देश आहे. चार्टर 2025 मध्ये स्वत:चे 25 वे वर्ष साजरे करणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. इस्रो याचा संस्थापक सदस्य आहे. चार्टर 17 सदस्य संघटनांच्या सहयोगी व्यवस्थेच्या स्वरुपात काम करते. चार्टर जगात येणाऱ्या आपत्तींच्या व्यवस्थापनासाठी भूअवलोकन डाटा उपलब्ध करविते.

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी आंतरराष्ट्रीय चार्टरच्या बोर्ड सदस्यांना संबोधित केले आणि आपत्ती व्यवस्थापन सहाय्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात चार्टरबद्दलच्या स्वत:च्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

इस्रोकडून सायन्स बैठकीचे आयोजन

इस्रोने चांद्रयान-4 संबंधी राष्ट्रीय विज्ञान बैठकीचे आयोजन केल्याचे शनिवारी सांगितले. ही बैठक चंद्रावरुन नमुने आणणाऱ्या चांद्रयान-4 मोहिमेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत अंतराळ विज्ञानाशी संबंधित अनेक अधिकारी सामील झाले. यात 12 संशोधन संस्थांचे प्रतिनिधीही होते. इस्रोचे वैज्ञानिक एम. गणेश पिल्लई यांनी बैठकीदरम्यान चांद्रयान-4 मोहिमेच्या संदर्भात राष्ट्रीय बैठकीच्या महत्त्वावर जोर दिला.

Comments are closed.