'गगनियाना' मध्ये 'vyomitra' जोडण्यासाठी इस्रो
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अवकाशात मानव पाठविण्याचे ध्येय भारताने दृष्टीसमोर ठेवले असून ते पूर्ण करण्याच्या दिशेने भारताची पावले वेगाने पडत आहेत, अशी माहिती भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’कडून देण्यात आली आहे. इस्रोने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ‘व्योमित्र’ नामक एक यंत्रमानवाचीं निर्मिती केली असून हा यंत्रमानव (रोबो) ‘गगनयाना’शी जोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
भारताचे गगनयान सध्या अंतराळभ्रमण करीत आहे. ते मानवमुक्त आहे. या यानाच्या कॅप्सूलमध्ये बसविण्याचा प्रयत्न डिसेंबर 2025 मध्ये केला जाणार आहे. या प्रयत्नासाठी इस्रो सज्ज होत असून तो यशस्वी झाल्यास प्रत्यक्ष मानव अवकाशात नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्यासारखे होणार आहे. ‘व्योमित्र’ हा शब्द संस्कृत असून त्याचा अर्थ ‘अंतराळ मित्र’ असा होतो. या व्योमित्राची निर्मिती पूर्ण झाली असून तो गगनयान अभियान नियंत्रित करणाऱ्या इस्रोच्या ‘मानवी अंतराळप्रक्षेपण केंद्रा’ला सुपूर्द करण्यात आला आहे. व्योमित्रचा आकार ‘अर्धमानवाकृती’ असून त्याला यंत्रमानवासारखे शीर, छाती, खांदे आणि बाहू आहेत. याची निर्मिती विशेषत्वाने अत्यल्प गुरुत्वाकर्षण स्थितीत विनासायास काम करता यावे, यासाठी करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. अंतराळात मानव पाठविण्याचा पराक्रम आजवर अमेरिका आणि रशिया या दोनच देशांनी केला असून भारताला यश मिळाल्यास तो तिसरा देश ठरणे शक्य आहे.
Comments are closed.