भुयारी मेट्रो मार्गिकेतील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न सुटणार; प्रवाशांना दिलासा मिळणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई मेट्रो मार्ग-3 अ‍ॅक्वा लाईनवर मोबाईल नेटवर्कचा प्रश्न आता सुटणार आहे. अ‍ॅक्वा लाईनवर कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू होणार आहे. अ‍ॅक्वा लाईनवरील इन-बिल्डिंग सोल्युशन्स पायाभूत सुविधांची उभारणी, संचालन आणि देखभाल करण्यासाठीचे स्वीकृती पत्र संयुक्तपणे भारती एअरटेल लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेड यांना प्रदान करण्यात आले आहे.

या 25 वर्षांच्या करारामध्ये प्रवाशांसाठी अखंडित व्हॉइस आणि डेटा सेवांची पुनर्स्थापना करण्यासह, सहा महिन्यांच्या आत BSNL नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तरतुदीचाही समावेश आहे. यामुळे भुयारी मेट्रो मार्गावरील प्रवाशांची सोय आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची आशा आहे.

Comments are closed.