एका आयपीएल मॅचच्या आयोजनासाठी येतो इतका खर्च; जाणून घ्या सविस्तर

इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचे आयोजन सध्या सुरू आहे. या मोसमात आतापर्यंत ५ सामने खेळले गेले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा मोठा पराभव करून राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. CSK चा आज दुसरा सामना पंजाब किंग्ससोबत आहे. पंजाबने पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. येथे आपण IPL च्या एका सामन्यात होणाऱ्या खर्चाबद्दल बोलत आहोत, जाणून घ्या पैसा कुठे खर्च होतो आणि एकूण खर्च किती येतो.

​इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन २००८ पासून केले जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दरवर्षी या लीगचे आयोजन करते, जी आता जगातील सर्वात मोठी टी-२० लीग आहे. बोर्ड सुद्धा या लीग मधून मोठी कमाई करते. कमाईचे मुख्य स्त्रोत स्पॉन्सरशिप, मीडिया राईट्स आणि तिकीट विक्री हे आहेत. कमाई तर कोट्यवधींमध्ये होते, पण एका आयपीएल सामन्यासाठी नक्की किती खर्च येतो? चला जाणून घेऊया.

​इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या मोसमात १० संघ खेळत आहेत, ज्यांच्यामध्ये लीग स्टेजचे सामने १३ ठिकाणांवर खेळवले जातील. अद्याप प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. बोर्ड सर्वात आधी स्टेडियम निवडते आणि ते बुक करते, ज्याची किंमत ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. BCCI ही रक्कम स्टेडियम व्यवस्थापनाला देते. मात्र, ठिकाणानुसार ही किंमत वेगवेगळी असते.

​त्यानंतर खेळाडूंचा पगार येतो. इम्पॅक्ट प्लेयरसह सर्व १२ खेळाडूंना प्रति सामना ७.५ लाख रुपये मिळतात. एक संघ खेळाडूंच्या पगारावर प्रति सामना ९० लाख रुपये खर्च करतो. याव्यतिरिक्त मॅच रेफरी, अंपायर आणि सपोर्ट स्टाफचा पगार वेगळा असतो.

​प्रवासासाठी साधारण ७ लाख रुपयांचा खर्च होतो. एकूण खर्चाचा विचार केला तर ब्रॉडकास्टिंग राईट्स सोडून एका सामन्यासाठी साधारण १५ कोटी रुपयांचा खर्च येतो.

Comments are closed.