‘पंचायत’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडणे अतिशय कठीण आहे; रघुबीर यादव यांचं मोठं विधान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ओटीटीवर एखादी मालिका हिट झाल्यानंतर त्यावर चित्रपट येण्याचा ट्रेंड आता सुरू झालेला आहे. मिर्झापूर नंतर आता  पंचायत ही मालिका हिट झाल्यानंतर तिच्यावर चित्रपट येणार असे कानावर येत होते. परंतु अशा गप्पा रंगत असतानाच आता रघुबीर यादव यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. ‘गावातल्या आयुष्याची गंमत तीन तासांत कशी दाखवणार? आणखी सीझन बाकी असताना चित्रपट कशाला?’ असा सवाल करत ‘पंचायत’ फेम रघुबीर यादव यांनी मालिकेच्या चित्रपटाच्या चर्चेवर आपलं मत मांडलं आहे. ‘मिर्झापूर’नंतर ‘पंचायत’चा चित्रपट येणार का, याची चाहत्यांना उत्सुकता असतानाच प्रधान पतींनी मात्र या प्रयोगाबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

पंचायतच्या माध्यमातून फुलेरा या गावातील अनेक छोट्या मोठ्या गोष्टी या प्रकाशझोतात आल्या. खासकरून या गावातील राजकारण आपण सर्वांनी घरबसल्या पाहिलं. परंतु मनोरंजनाच्या या सीमा केवळ ओटीटीपर्यंतच मर्यादीत राहणार का असा अनेकांना प्रश्न पडला होता. याच फुलेराला मोठ्या पडद्यावर आणायचं म्हटलं, तर सगळं तीन तासांत कसं बसवणार, हा प्रश्न रघुबीर यादव यांनी उपस्थित केला आहे. ‘मिर्झापूर’च्या चित्रपटानंतर ‘पंचायत’चाही चित्रपट व्हावा, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, रघुबीर यादव यांना हा प्रयोग तितका सोपा वाटत नाही. त्यांच्या मते, गावातील आयुष्याचा पसारा इतका मोठा आहे की तो तीन-चार तासांत मांडणं कठीण आहे.

‘व्हरायटी इंडिया’शी बोलताना रघुबीर यादव म्हणाले की, ‘पंचायत’चा चित्रपट बनवायचा की नाही, हे लेखकांनी ठरवायचं आहे. त्यांनी निर्णय घेतला, तर आपण काम करायला तयार आहोत. मात्र, चित्रपट बनवून मालिकेच्या पुढील सीझनची मजा का घालवायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर अधिक बोलताना ते म्हणाले, , “लेखकाच्या मनात कदाचित आणखी अनेक सीझनची कथा असेल. मग चित्रपट बनवून त्या सीझनची कथा का बिघडवायची? मी स्वतः गावांमध्ये राहिलो आहे. एखाद्याचं संपूर्ण आयुष्य तीन-चार तासांत मांडणं खूप कठीण आहे. बनराकस, मंजू देवी किंवा सचिवजी यांच्यापैकी कोणाचंही आयुष्य पाहिलं, तरी तीन तासांचा कालावधी खूप कमी आहे.”

रघुबीर यादव यांनी चित्रपटाच्या कल्पनेला पूर्णपणे नकार दिलेला नाही. लेखकांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, तर त्यात काम करण्यास आपण तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे फुलेराची ही मंडळी मोठ्या पडद्यावर दिसणार का, याची उत्सुकता कायम आहे.

Comments are closed.