आपल्या कामाशी काम ठेवा…! ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मेलोनी यांचा जबरदस्त पलटवार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील शाब्दिक चकमक आता वाढत आहे. इटलीच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला शनिवारी जबरदस्त प्रत्युत्तर दिले. त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना स्पष्टपणे सांगितले की त्यांनी आपल्या कामाशी काम ठेवावे.

ट्रम्प यांनी दावा केला होती की, फ्रान्समधील एका बैठकीदरम्यान मेलोनी यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची वारंवार विनंती केली. मेलोनी आपली घसरलेली लोकप्रियता सावरण्यासाठी असे करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर पलटवार करत मेलोनी यांनी ट्रम्प यांना सुनावले की, ट्रम्प विनाकारण सतत निरर्थक वक्तव्ये करत आहेत. माझ्या लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुमची मैत्रीण असण्याचा काही उपयोग झाला नाही. तसेच, ती तुमच्यासोबतच्या माझ्या संबंधांवरही अवलंबून नाही, असे त्यांनी सांगितले.

मेलोनी म्हणाल्या की, माझी लोकप्रियता इटलीच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याच्या माझ्या क्षमतेवर अवलंबून आहे. मी ते नेहमीच केले आहे. इटलीमधील अमेरिकेच्या लष्करी तळांच्या बाबतीतही मी तेच केले. आम्ही त्यांच्या वापरासंबंधीच्या करारांचा नेहमीच आदर केला आहे. जोपर्यंत मी पंतप्रधान आहे, तोपर्यंत त्यांचे उल्लंघन होऊ शकत नाही. इटली एक सार्वभौम देश आहे. तसेही, माझ्या लोकप्रियतेचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. मी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लोकप्रियतेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देते.

मी या विषयावर पुन्हा चर्चा करणार नाही. कारण माझा अजूनही पाश्चात्य एकतेवर विश्वास आहे. मला वाटत नाही की या गोष्टी आपल्या उद्देशासाठी योग्य आहे. त्यामुळे आपल्या कामाशी काम ठेवा, असे मेलोनी यांनी ट्रम्प यांना सुनावले आहे.

Comments are closed.