वर्ल्डकपआधीच ईटलीचा आयर्लंडला धक्का, रोहितच्या ‘या’ आंतरराष्ट्रीय टी20 विक्रमाचीही बरोबरी
क्रिकेटमध्ये नेहमी काही ना काही आश्चर्यकारक निकाल लागत असतात. टी२० विश्वचषक २०२६च्या पार्श्वभूमीवर अनेक संघ,सध्या टी२० मालिका खेळत आहेत. ईटली आणि आयर्लंड यांच्यातही तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली. यातील तिसरा सामना ईटलीने ४ विकेट्सने जिंकत आर्यलंडबरोबर सर्वांना चकित केले. हा विजय ईटलीसाठी ऐतिहासिक क्षण होता. त्यांनी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये संपूर्ण सदस्य असलेल्या संघाचा पराभव केला.
या सामन्यात ईटलीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आर्यंलडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकेही पूर्ण खेळली नाहीत. त्यांनी १९.४ षटकात सर्व विकेट्स गमावत १५४ धावसंख्या केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ईटलीला शेवटच्या षटकात विजयासाठी ३० धावांची गरज होती.
तिसऱ्या सामन्यात ईटलीने शेवटच्या दोन षटकातच सामन्याचा निकाल पालटला. त्यांनी ३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या विजयानंतर जागतिक क्रमवारीत २८व्या स्थानावर असणाऱ्या ईटलीने ११व्या स्थानावर असलेल्या आर्यलंडला नक्कीच धक्का दिला आहे.
ईटलीचा फलंदाज ग्रांट स्टेवार्टने शेवटच्या षटकात लागोपाठ तीन षटकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात १९ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या.
नेहमी विरोधी संघांना त्रास देणारा आयर्लंडचा या सामन्यातील पराभव चर्चेचा विषय बनला आहे. तसेच त्यांचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने आंतरराष्ट्रीय टी२० मधील रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने रोहितच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहितने त्याच्या कारकिर्दीत भारतासाठी १५९ टी२० सामने खेळले आहेत. तर स्टर्लिंगचाही ईटलीविरुद्धचा हा सामना त्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२०मधील १५९वा सामना ठरला आहे.
ईटली आणि आयर्लंड टी२० विश्वचषक २०२६चा भाग आहेत. ईटली या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार असून ते गट क आणि आयर्लंड गट ब मध्ये आहेत. ७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
Comments are closed.