आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?

नवी दिल्ली : 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत आहे. यंदाच्या वर्षी देखील इन्कम टॅक्स कायदा 1961 नुसार आयटीआर फाईल करावा लागेल. आयटीआर-1 म्हणजेच सहज हा व्यक्तींसाठी लागू असतो.  31 जुलैनंतर आयटीआर भरावा लागल्यास विलंब शुल्क भरावं लागेल. त्यामुळं 31 जलैपूर्वीच आयटीआर  फाईल करणं आवश्यक आहे.

आयटीआर-1 भरण्यासाठी किती उत्पन्न मर्यादा?

भारतातील निवासी व्यक्ती ज्यांचं वार्षिक उत्पन्न 50 लाखांच्या आत असल्यास आयटीआर-1 भरावा लागतो.   पगार आणि पेन्शनमधून आलेलं उत्पन्न, एखाद्या मालमत्तेतून आलेलं उत्पन्न,  इतर व्याज उत्पन्न, कुटुंबाची पेन्शन,शेतीचं उत्पन्न 5000 आणि इक्विटी आधारित म्युच्युअल फंड आणि स्टॉक विक्रीतून होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन सव्वा लाखांपेक्षा कमी असल्यास आयटीआर-1 भरावा लागेल.

आयटीआर फायलिंगसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

आयटीआर-1 फाईल करण्यासाठी तुम्ही नोकरदार असल्यास कंपनीकडून फॉर्म 16  तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. याशिवाय सगळ्या उत्पन्नाच्या स्त्रोतांची यादी बनवणं आवश्यक आहे.  यास एआयएस म्हणजेच वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. AIS इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर मिळेल. ते डाऊनलोड करुन घेणं आवश्यक आहे.

ITR  कसा भरायचा?

इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स च्या पोर्टलला भेट देऊन लॉगीन करावं लागेल. पॅनकार्ड क्रमांक नोंदवून आणि पासवर्ड टाकून लॉगीन करावे लागेल. यानंतर फाईल नॉऊवर क्लिक करुन 2026-27 असेसमेंट वर्ष निवडून आयटीआर -1 फॉर्मची निवड करावी. तिथं त्यानंतर न्यू टॅक्स रिजीम आणि ओल्ड टॅक्स रिजीमची निवड करुन आयटीआर फाईल करावा. या पोर्टलवर प्रीफिल माहिती उपलब्ध असेल. तुम्ही खासगी कंपनीत नोकरी करत अर्ज असल्यास तो पर्याय निवडल्यास 31 जुलैपूर्वी 139 (1) चा पर्याय निवडावा लागेल.यानंतर पुढील भागात फॉर्म 16 आणि प्रीफिलनुसार दिसणारी आकडेवारी तपासून घ्या. सर्व माहिती तपासून घेऊन आयटीआर सबमिट करावा. यानंतर वॅलिडशन आणि वेरिफिकेशन करुन घ्यावं. यानंतर आधार ओटीपीद्वारे वेरिफिकेशन करुन घ्यावं.

आयटीआर फाईल करण्यासाठी अखेरच्या तारखेपर्यंत वाट पाहू नका. कारणं शेवटच्या काही दिवसांमध्ये फायलिंगचा लोड वाढल्यानं पोर्टलवर ताण वाढून ते क्रॅश होण्याची शक्यता असते. लवकर आयटीआर फाईल केल्यानं टॅक्स रिफंडची प्रक्रिया देखील लवकर होते. तुम्ही वेळेत आयटीआर फाईल करत असल्यानं एआयएस म्हणजेच वार्षिक माहिती पत्रकातील रकमांची पडताळणी करता येऊ शकते.

दरम्यान, 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींकडून 31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल न करण्यात आल्यास त्यांना त्यानंतर 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तर, 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असताना 31 जुलैनंतर आयटीआर फाईल करायचा असल्यास 5000 रुपयांचा दंड भरावा लागेल.

हेदेखील वाचा

Comments are closed.