सचिनचा हा महाविक्रम तोडणं अशक्य, 27 वर्षांपासून कोणी जवळही फिरकलं नाही!

सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते. सचिन तेंडुलकरने त्यांच्या क्रिकेट करिअर दरम्यान काही रेकॉर्ड्स बनवले आहेत, पण एक वर्ल्ड रेकॉर्ड असा आहे त्याला तोडणे अशक्य आहे. सचिन तेंडुलकर यांनी 15 नोव्हेंबर 1989 रोजी त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 24 वर्ष क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर सचिन तेंडुलकरने 14 नोव्हेंबर 2013 रोजी त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सचिन तेंडुलकरने त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअर दरम्यान वनडेमध्ये 18,426 आणि कसोटी मध्ये 15,921 धावा बनवल्या आहेत. सर्व फॉरमॅटमध्ये मिळून सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

सचिन तेंडुलकर यांच्या नावावर वर्षभरात सर्वात जास्त वनडे धावा करण्याचा विक्रम आहे. 1998 मध्ये 1894 वनडे धावा करण्याचा विक्रम केला होता. 27 वर्षांपासून सचिन तेंडुलकर यांचा हा विक्रम जगातील कोणताच फलंदाज तोडू शकला नाही. 1998 सालामध्ये सचिन तेंडुलकरने 34 वनडे सामन्यांच्या 33 डावांमध्ये 65.31 च्या चांगल्या सरासरीने 1894 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने यादरम्यान 7 अर्धशतक आणि 9 शतके झळकावली होती. त्यादरम्यान त्यांची सर्वाधिक धावसंख्या 143 धावांची होती.

आत्ताच्या काळात जेव्हा वनडे आंतरराष्ट्रीय सामने कमी प्रमाणात खेळले जात आहेत, अशामध्ये सचिन तेंडुलकर यांचा तो विक्रम तोडणे तर लांबच आहे. पण विचारही करून सुद्धा घाम येईल. सचिन तेंडुलकर यांनी त्यांचा पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना 18 डिसेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. तसेच शेवटचा वनडे आंतराष्ट्रीय सामना 18 मार्च 2012 रोजी पाकिस्तान विरुद्धच त्यांनी खेळला होता. सचिन तेंडुलकर यांचं वनडे आंतरराष्ट्रीय करिअर 22 वर्ष 91 दिवस एवढं आहे. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सामनावीर जिंकण्याचा विक्रम सचिनच्याच नावावर आहे. सचिन तेंडुलकर यांनी पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त 62 वेळा वनडे क्रिकेटमध्ये सामनावीर हा पुरस्कार जिंकला आहे.

सचिन तेंडुलकरने 22 वर्ष 91 दिवसांच्या मोठ्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 463 वनडे सामन्यांच्या 452 डावांमध्ये 44.83 च्या चांगल्या सरासरीने 18,426 धावा केल्या आहेत. सचिनने यादरम्यान 96 अर्धशतक आणि 49 शतके झळकावली आहेत. सचिनची वनडे आंतराष्ट्रीय क्रिकेट दरम्यान सर्वोत्तम खेळी 200 धावांची आहे.

Comments are closed.