ते एक टॉप सिक्रेट आहे… म्हणत इराणच्या नाकेबंदीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याचा ट्रम्प यांचा दावा, माध्यमांनाही फटकारले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण – अमेरिका यांच्यात युद्धविराम वाढवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असली तरी शांतता चर्चेचा दुसरा टप्पा पार पडलेला नाही. होर्मुझ सामुद्रधुनीचा प्रश्नही कायम आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ नाकेबंदी संदर्भात नवं विधान केलं आहे.

इराणविरुद्ध लागू करण्यात आलेला नाकेबंदीचा उपाय एक अत्यंत प्रभावी उपाय ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या भागात अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच इराणने या भागातील अनेक देशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्तासंदर्भात त्यांनी इशाराही दिला आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘हे टॉप सिक्रेट आहे (अत्यंत गोपनीय बाब आहे). नाकेबंदीच्या संदर्भात आम्ही जे काही केले आहे ते आश्चर्यकारक असून, त्यातून कोणीही आरपार जाऊ शकत नाही. कोणालाही तिथून बाहेर पडायचे नाहीये आणि कोणी तसा प्रयत्नही करत नाहीये… आमचे त्यावर पूर्ण नियंत्रण आहे… इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, बहरीन अशा विविध ठिकाणांवर जे हल्ले केले, त्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. खरं पाहता, ते केवळ इस्रायलवर हल्ला करतील असंच सर्वांना वाटत होतं, पण ते इतर अनेक देशांदेखील लक्ष्य करतील अशी अपेक्षा नव्हती. मला वाटते की ही एक मोठी चूक होती. जर ते सागरी सुरुंग पेरून ठेवत असतील, तर ती त्यांच्यासाठी फार मोठी चूक असेल, असे मी म्हणेन’.

त्याचे-एक-टॉप-गुप्त-डोनाल्ड-ट्रम्प-दावे-पूर्ण-नियंत्रण-वर-इराण-नाकाबंदी-स्लॅम-मीडिया

दरम्यान, याआधी ट्रम्प यांनी असा देखील दावा केला आहे की, इराण सोबतचा संघर्ष संपवण्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की इराण सध्या लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनला आहे. तसेच करारासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या हिताचा करार असेल तरच तो करार केला जाईल, असंही पुढे म्हटलं आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे त्यांच्या धोरणांच्या विरोधात लिहिणाऱ्या, आवाज उठवणाऱ्या माध्यमांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘जे लोक सध्या ‘द फेलिंग न्यूयॉर्क टाइम्स’ वाचत आहेत किंवा ‘फेक न्यूज सीएनएन’ पाहतात आणि ज्यांना असं वाटतं की मी इराणसोबतचे युद्ध (जर तुम्ही त्याला युद्ध म्हणत असाल तर!) संपवण्यासाठी ‘उतावीळ’ आहे, त्यांनी कृपया हे लक्षात घ्यावं की, या पदावर असलेला मी कदाचित असा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्यावर आजवरचा सर्वात कमी दबाव आहे. माझ्याकडे पूर्ण वेळ उपलब्ध आहे, पण इराणकडे मात्र वेळ नाही – त्यांच्यासाठी घड्याळाचे काटे वेगाने फिरत आहेत’. काही प्रसारमाध्यमांची कामगिरी इतकी सुमार असण्याचे कारण म्हणजे त्यांची विश्वासार्हता आता उरलेली नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्या अमेरिकेच्या माधमांना लक्ष्य केलं आहे.

सामना अग्रलेख – ट्रम्पकृत भारताचा अपमान, मोदींचे अर्थात मौन!

Comments are closed.