नवरात्रीदरम्यान भीषण अपघात; भरधाव वेगातील बस घुसली दुर्गा मंडपात, २० जण चिरडले; ड्रायव्हर दारूच
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक भीषण अपघात (Horrific accident IN MP) झाला आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुर्गा माताच्या मंडपाला धडक दिली.या अपघातात २० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील (Horrific accident IN MP) जबलपूरमध्ये ही घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणारी बस दुर्गा पूजा मंडपात घुसली, ज्यामध्ये २० हून अधिक लोक जखमी झाले, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. मंडपात चेंगराचेंगरी झाली आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळून गेले. जबलपूरच्या सिहोरा भागात ही घटना घडली आहे.(Horrific accident IN MP)
Horrific accident IN MP: बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट
काल(मंगळवारी ता ३०) रात्री उशिरा, जबलपूरमधील सिहोरा येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुर्गा पूजा मंडपात धडक दिली. अनियंत्रित बस मंडपात शिरताच गोंधळ उडाला आणि लोक गोंधळून पळून गेले. या अपघातात २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.घटनेची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह आणि पोलिस अधीक्षक संपत उपाध्याय, भिसिहोरा पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. बस कटनीहून जबलपूरला जात असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सिहोरा गौरी चौकाजवळ, बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पंडालमध्ये गेली. गंभीर जखमींना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे जिल्हाधिकारी आणि एसपी स्वतः जखमींवर उपचार करत आहेत. सध्या पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.
Horrific accident IN MP: बस चालक दारूच्या नशेत
प्रत्यक्षदर्शींंच्या मते, बस चालक दारूच्या नशेत होता. याच कारणामुळे त्याचे वाहनावर नियंत्रण गमावलं. अपघातानंतर संतप्त लोकांनी बसवर दगडफेक केली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना त्वरित सिहोरा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज, जबलपूर येथे रेफर करण्यात आले. यामध्ये सहा जणांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
गंभीररीत्या जखमी झालेल्या लोकांमध्ये खुशबू बंशकार (१७ वर्ष), रोली सोनी (२५ वर्ष) आणि सिपाहीलाल विश्वकर्मा यांना सुपर स्पेशलिटी रुग्णालयात हलवण्यात आले. याशिवाय ममता कोल, बंदना बर्मन, संध्या चौधरी, शिखा चौधरी, कैलाश चौधरी, मनीष दहिया, कोदुलाल बर्मन आणि सोहनलाल यांच्यासह अन्य अनेक जण जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात ड्युटीवर असलेला एक कर्मचारीही जखमी झाला आहे. तसेच, एक जवळपास १२ वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.