अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड, आठ जणांना ताब्यात घेतले; सुरक्षा वाढवली
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीमध्ये मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे सदस्य (जेएसी) आक्रमक झाले. जेएसी सदस्यांनी रविवारी सायंकाळी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड केली. झाडांच्या कुंड्याही फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. अल्लू अर्जुनच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पीडित महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये आर्थिक मदत आणि कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत देण्याची मागणी जेएसीच्या सदस्यांनी केली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेवेळी अल्लू अर्जुन घरी नव्हता.
अभिनेत्याचे चाहत्यांना आवाहन
अभिनेता अल्लू अर्जुनने याआधी कोणतेही गैरवर्तन न करण्याची विनंती लोकांना केली होती. एक पोस्ट शेअर करत अल्लूने ही विनंती केली होती. तसेच कोणत्याही प्रकारे अपमानास्पद वागणूक किंवा भाषा वापरणे टाळण्याचे आवाहनही केले होते.
Comments are closed.