जगन्नाथ मंदिर, अधिकारी, याजकांद्वारे मोबाइल फोनच्या वापरावर बंदी घालतात

पुरी

: ओडिशातील श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने पुरी मंदिरात अधिकारी, पोलीस आणि सेवादारांच्या मोबाइल फोन वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  मंदिराच्या ‘छत्तीसा निजोग’ बैठकीत हा निर्णय घेण्यात आाल आहे. मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंद कुमारी पाधी यांनी पहिल्या टप्प्यात मंदिरात पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मोबाइल वापरावर बंदी घातली जाणार असून नंतर याचा विस्तार सेवादारापर्यंत केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. कुठल्याही आपत्कालीन स्थितीकरता किंवा महत्त्वपूर्ण संदेशांच्या संचारासाठी अधिकारी निश्चितस्थळी जात मोबाइलचा वापर करू शकतील, परंतु मंदिराच्या आत कुणालाही मोबाइलचा उघडपणे वापर करण्याची अनुमती नसेल. मंदिर प्रशासन यासंबंधी दिशानिर्देश जारी करणार आहे. जर कुणाकडून या नियमाचा भंग झाला तर त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे पाधी यांनी सांगितले. जगन्नाथ मंदिरात भाविकांना मोबाइल किंवा कॅमेरा उपकरण नेण्यास बंदी आहे.

Comments are closed.