मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, अचानक राजीनामा देण्याचं कारण काय?
उपाध्यक्ष जगदीप धनखर राजीनामा: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Voice President jagdeep Dhankhar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. राजीनामा देताना धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत. धनखड यांना दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे.
-भारताचे उपाध्यक्ष (@vpindia) 21 जुलै, 2025
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाता राजीनामा दिला आहे. दरम्यान, अचानक जगदीप धनखड यांना राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे असे धनखड म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.