दादरमध्ये पसायदान संस्थेने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात जय जवान पथकाने रचले नऊ थर, पहा व्हिडीओ

आज जन्माष्टमी असून मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्साह आहे. यातच जय जवान या मंडळाने नऊ थर रचला आहे.

दादरच्या हिंदू कॉलनीत पसायदान संस्थेकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात जय जवान पथकानेही सहभाग नोंदवला होता. या उत्सवात जय जवान पथकाने तब्बल नऊ थर रचले आहे.

पसायदान संस्थेने यावेळी 21 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जे पथक पसायदानची हंडी फोडेल त्या पथकाला 21 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

Comments are closed.