जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली.

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी इराण युद्ध सुरू झाल्यापासून चौथ्यांदा इराणी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी मध्यपूर्वेतील वाढत्या तणावावर चर्चा केली. अमेरिका आणि इस्रायली कारवायांमुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे असे अराघची यांनी सांगितले. इराण सरकार, जनता आणि लष्कर हल्ल्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यास तयार आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी इराणवरील हल्ल्यांचा निषेध करावा असेही अराघची यांनी सांगितले. यावेळी शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी ब्रिक्ससारख्या व्यासपीठांना भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. भारत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहकार्य वाढविण्यास तयार असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. या प्रदेशात शांतता आणि सुरक्षा राखणे ही सर्व देशांची जबाबदारी असल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे.

Comments are closed.