अल्पवयीन मुलाचं फिट आल्याचं नाटक, सेवानिवृत्त शिक्षक धावला मदतीला, तोच चोरट्यांनी रकमेवर हात सा

जलगाव गुन्हा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) शहरातील नूराणी नगर भागात चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाचा वापर करून मुख्याध्यापकांकडून सेवानिवृत्त शिक्षकाच्या ताब्यात दिलेली रोकड चोरली गेली आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पाचोरा पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे. (Jalgaon Crime News)

फिट आल्याचा बनाव करून केलं लक्ष विचलित

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक जेडीसीसी बँकेतून एका मुख्याध्यापकांनी शाळेसाठी संगणक खरेदीसाठी आणि बांधकाम मिस्त्रीला देण्यासाठी दोन लाख रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांच्या ताब्यात दिली. शेख खलिल यांनी ही रोकड आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि घराकडे निघाले.

घरी पोहोचताच, त्यांनी आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये दुचाकी लावली आणि तेवढ्यात रस्त्यावर एक लहान मुलगा अचानक खाली पडून फिट आल्याचा नाट्यमय अभिनय करू लागला. खलिल शेख हे तत्काळ मदतीसाठी त्या मुलाकडे धावले. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीची चावी दुचाकीलाच राहिली होती.

सहकाऱ्यांसह सिनेस्टाईल पळ

घटनेच्या काही क्षणांतच दोन अनोळखी इसम दुचाकीवर तेथे आले. त्यांनी शेख खलिल यांना ‘मुलाला पाणी द्या’ असा सल्ला देत त्यांचे लक्ष अधिक विचलित केले. शेख खलिल घरात पाणी आणायला गेले, आणि त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाख रुपये चोरले. त्यानंतर अल्पवयीन मुलासह तिघांनी मिळून सिनेस्टाईलने पळ काढला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाचोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केलं, इन्स्टाग्रामवर मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो शेअर केला, बदनामी झाल्यानं नाशिकमधील अल्पवयीन मुलीनं गळ्याला लावला दोर

Nanded Crime News: वर्षभरापूर्वी लग्न, तरीही प्रियकराशी लपून भेटणं, बोलणं सुरूच, सासरच्यांनी सुनेला अन् तिच्या बॉयफ्रेंडला नको त्या अवस्थेत पाहिलं; पुढे नको ते घडलं!

आणखी वाचा

Comments are closed.