कुटुंबातील वादात मध्यस्थी करणं जीवावर बेतलं; पतीने पत्नीच्या मामाला चाकूनं भोसकून संपवलं, जळगाव

जलगाव गुन्हा: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) शहरात कौटुंबिक वादाने टोकाचं रूप घेत एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पत्नीच्या मामाचा, पतीनेच चाकूने वार करत खून केला. या हल्ल्यात सासरे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime)

कौटुंबिक वादातून संताप अनावर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत समद शेख हे आरोपी सुभान शेख यांच्या पत्नी सईदा शेख यांचे मामा होते. गेल्या काही दिवसांपासून सुभान आणि सईदा यांच्यात वारंवार वाद सुरू होता. दोन दिवसांपूर्वी पत्नी सईदा घर सोडून माहेरी गेल्यानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा साधण्यासाठी शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) रात्री नातेवाईकांची बैठक बोलावण्यात आली होती.

वाद चिघळला आणि हल्ला केला

बैठकीदरम्यान वाद शमण्याऐवजी चिघळत गेला आणि अचानक सुभान शेख याने चाकू काढून समद शेख यांच्यावर छाती, मान आणि पोटावर सपासप वार केले. याच दरम्यान, समद शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे सासरे जमील शेख यांच्यावरही हल्ला करण्यात आला.

एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

या हल्ल्यात समद शेख गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले, तर जमील शेख यांना तात्काळ भुसावळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुभान शेख याला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे भुसावळ शहरात भीतीचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण…; नाशिकमधील धक्कादायक घटना

Pooja Gaikwad: ‘…बस नेक्स्ट मस्त होना चाहीये!’ गळ्यात मंगळसूत्र अन् सगळ्या पोस्ट S साठीच, पूजाचा आणखी एक चेहरा समोर, तिचा हा S कोण?

आणखी वाचा

Comments are closed.