प्रेमप्रकरणावरुन मुलाची निर्घुण हत्या, वडिलांनी पोलीस प्रशासनासमोर फोडला टाहो; परिसरात तणाव
जलगाव गुन्हा: जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात 10- 15 जणांच्या टोळक्याने केलेल्या अमानुष मारहाणीत सुलेमान खान या तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली होती .आरोपींनी एवढ्यावरच न थांबता सुलेमानचा मृतदेह मूळ गावी आणून घरासमोर फेकला व त्याच्या आईवडिलांनाही बेदम मारहाण केल्याच्या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे . जमावाच्या मारहाणीत मुलाच्या झालेल्या मृत्यूनंतर आता मृत सुलेमान खान याच्या वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि आपल्या परिवाराला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केलीय . प्रेम प्रकरणाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत जामनेर तालुक्यात बेटावद खुर्द गावातील सुलेमान खानचा मृत्यू झाल्याची चर्चा असून पोलीस अधिक तपास करत आहेत .
वडिलांनी पोलीस प्रशासनासमोर फोडला टाहो
जमावाच्या मारहाणीत मुलाच्या झालेल्या मृत्यूनंतर आता मृत सुलेमान खान याच्या वडीलांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि आपल्या परिवाराला पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. प्रेम प्रकरणाच्या संशय वरून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द गावातील सुलेमान खान या तरुणास दहा ते बारा जणांनी जामनेर सह त्याच्या बेटावद येथील घराच्या समोर बेदम मारहाण केली होती,या मारहाणीत सुलेमान गंभीर होऊन त्याचा मृत्यू झाला होता. सुलेमान याला मारहाण का झाली? याबाबत पोलिस अद्याप कारणाचा शोध घेत असले तरी,एका तरुणीशी प्रेम संबंध असल्याचा संशय वरून त्याला मारहाण करण्यात आल्याची जामनेर मध्ये चर्चा आहे.
सुलेमानच्या मृत्यूनंतर पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव
सुलेमान खान याच्या मृत्यूनंतर काही वेळातच मोठा जमाव पोलिस ठाण्याच्या समोर जमला होता,आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात होती.पोलिसांनीही घटनेचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यासोबत चार जणांना लागलीच ताब्यात घेतले असल्याने जमाव नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळाले होते, या घटनेत आता पर्यंत पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून,अजून चार संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.
प्रेमप्रकरणातून मारहाणीची चर्चा
या घटनेत सुलेमान खान याला दहा ते बारा तरुणांनी मारहाण का केली या बाबत पोलिस तपास सुरू असल्याचं पोलिस सांगत असले तरी,प्रेम प्रकरणातून त्याला मारहाण केली गेली आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची संपूर्ण जामनेर मध्ये चर्चा आहे,या घटनेत पोलिसांनी सुलेमान याच्या हत्ये संदर्भात विविध गुन्ह्याची कलमे लावली असताना,त्याचा मोबलिंचिंग कलम ही लागू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
आणखी वाचा
Comments are closed.