जळगावमध्ये सिनेस्टाईलने पाठलाग करत तरुणावर चाकूहल्ला, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव क्राईम न्यूज : जळगावमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणावर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोलाणी मार्केटमध्ये साई बोराडे असं नाव असणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्याच्या  छातीवर चाकूने वार करण्यात आला आहे. संशयित आरोपी शुभम सोनवणेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जळगाव महापालिकेत उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना बाजूच्याच मार्केटमध्ये हल्ला झाल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाली होते.

संशयित आरोपी शुभम सोनवणे याला शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात एका तरुणावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साई गणेश बोराडे असे जखमी तरुणाचे नाव असून, या प्रकरणी संशयित आरोपी शुभम सोनवणे याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, महापालिकेत उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना बाजूच्याच मार्केटमध्ये हल्ला झाल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी अज्ञात कारणावरून शुभम सोनवणे याने गोलाणी मार्केट परिसरात साई बोराडे याचा पाठलाग करत छातीवर चाकूने वार केला.

गंभीर जखमी झालेल्या साईला तातडीने रिक्षाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले

गंभीर जखमी झालेल्या साईला तातडीने रिक्षाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, महापालिकेत अर्जांची छाननी सुरू असतानाच महापालिकेला लागून असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये ही घटना घडल्याने परिसरात गोंधळ व भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

गेल्या काही दिवसापासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका बाजुली महानगरपालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता सुरु असताना दुसऱ्या बाजुला अशा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या घटनेनंतर काही काळ गोलाणी मार्केट परिसरात तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, हल्ल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

‘मुंबई आता सुरक्षित…’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला, आरोपी अजूनही मोकट; POST करत संताप व्यक्त

आणखी वाचा

Comments are closed.