धक्कादायक! पोलीस स्टेशन शेजारीच असणारं ATM मशीन चोरीला, 10 लाखांची रोकड लंपास, घटना CCTV त कैद
जळगाव क्राईम न्यूज : जळगावात शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील एटीएम मशीन चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांचा एटीएम मशीन सोडतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चोरुन नेलेले एटीएम मशीन जळगाव तालुक्यातील कंडारी गावाजवळील जंगलात सापडले आहे. एमटीएम मशीन सापडले मात्र मशीन मधील दहा लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मिळत आहे.
एटीएममध्ये तब्बल दहा ते पंधरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली
चित्रा चौकात असलेले ऍक्टिवास स्मॉल फायनान्स बँकेचे एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंडारी गाव परिसरातील जंगलात चोरुन नेलेले एटीएम मशीन मिळून आले आहे. एटीएममध्ये तब्बल दहा ते पंधरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती सूत्रकडून मिळाली आहे. पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील एटीएम मशीन चोरून नेल्याच्या या घटनेने पोलिसांच्या गस्तीवर, कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.