तोंडाला रुमाल लावून चड्डीवर एन्ट्री; मंदिरांमधून चांदीच्या पादुका, गणेशमूर्ती, दान रक्कम लांबवि
जलगाव गुन्हेगारीच्या बातम्या: जळगावमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहरात चड्डी गँगने धुमाकूळ (Jalgaon Robbery In Temple) घातला आहे. चड्डी गँगने जळगाव शहरातील दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, गणपतीमूर्ती, दान रक्कम लांबवल्याचेही समोर आले आहे. तसेच चोरट्यांच्या हातात चॉपर, चाकू, तलवारी यासारखे शस्त्रदेखील असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक देखील आता भयभीत झाले आहेत.
जळगाव शहरात मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तसेच तोंडाला मास्क, रुमाल लावून केवळ चड्डीवर असलेले चौघही चोरटे परप्रांतीय असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे.
चोरट्यांकडे हातात चॉपर, चाकू, तलवारी-
रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 700 ग्रॅम चांदीच्या पादुका, गणपतीची दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. त्यामुळे रक्कम किती होती, हे नेमके समजू शकलेले नाही. मंदिर व घरामध्ये चोरी करणारे चौघेजण हे इतर राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चोरटे या परिसरातून फिरत असताना त्यांच्या हातात चॉपर, चाकू, तलवारी यासारखे शस्त्रदेखील होते, अशी माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.
तोंडाला मास्क, रुमाल लावून केवळ चड्डीवर-
चड्डी गँगनी केलेल्या चोरीच्या घटना परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. तोंडाला मास्क, रुमाल लावून केवळ चड्डीवर असलेले चारजण रस्त्याने येताना दिसत आहे. एका घराकडे पाहत जात ते मंदिरांमध्ये प्रवेश करून चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मंदिरातून निघताना एकाने चप्पल हातात घेतलेली आहे, तर एकाने कमरेला बांधलेली दिसत आहे. मध्यरात्री २.३१ वाजेदरम्यानचे फुटेज कैद झाले आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.