जळगाव पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूत अटक

जलगाव: जळगाव पोलिसांनी (Jalgaon Police) आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 24 जुलै रोजी नाकेबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी तब्बल 64 कोटी 90 लाख रुपये किमतीचे अँफेटामाईन ड्रॅग जप्त केले होते. अँफेटामाईन ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. अँफेटामाईन ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधारास पोलिसांनी तामिळनाडूमधील नागापट्टम जिल्ह्यातील विलुंदामावडी येथून अटक केली आहे.
महालिंगम नटराजन असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स माफीयाचे नाव आहे.

समुद्र वाहतुकीद्वारे ड्रग्सची तस्करी केल्याचा संशय

अँफेटामाईन ड्रग्स प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन यांचा मुलगा योगेश महालिंगम विदेशात फरार आहे. ड्रग्स माफिया महालिंगम नटराजन याचे विलुंदामावडी हे गाव श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने समुद्र वाहतुकी द्वारे ड्रग्स ची तस्करी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. अटक करण्यात आलेला ड्रग्स माफिया महालिंगम नटराजन व त्याची पत्नी विलुंदामावडी येथील माजी सरपंच तर दुसरा मुलगा ॲलेक्स महालिंगम माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. या प्रकरणात अँफेटामाईन ड्रग्स वाहतूक करणाऱ्या कारचालक अब्दुल सय्यद याला यापूर्वीच चाळीसगाव पोलिसांनी अटक केली होती. ड्रग्स वाहतूक करणाऱ्या कारचालक अब्दुल सय्यद याला एका खेपसाठी हवालामार्गे 10 ते 15 लाख रुपये मिळत होते.

अँफेटामाईन ड्रग्स हे अत्यंत घातक अंमली पदार्थ

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 24 जुलै रोजी नाकीबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी 64 कोटी 90 लाख रुपये किमतीचे अँफेटामाईन ड्रग्स हे अत्यंत घातक अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणाची तपासणी करताना पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तामिळनाडूमधील नागापट्टम जिल्ह्यातील विलुंदामावडी येथून ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार महालिंगम नटराजन यास अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन याचा मुलगा योगेश नटराजन हा विदेशात फरार होण्यास यशस्वी झाला आहे. विलुंदामावडी हे गाव श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने जल वाहतुकीद्वारे महालिंगम नटराजन याच्याकडून परदेशातही ड्रग्स तस्करी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार याची राजकीय पार्श्वभूमी समोर आली असून महालिंगम नटराजन व त्याची पत्नी हे विलुंदामावडी येथील माजी सरपंच आहे तर महालिंगम नटराज यांचा दुसरा मुलगा ॲलेक्स महालिंगम हा जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दिल्ली येथील कारचालक असीम अब्दुल सय्यद यास पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर देशभर या ड्रग्स तस्करीचे पाळेमुळे रोवल्या गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

आणखी वाचा

Comments are closed.