कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या रील स्टारचा माजी सैनिक असलेल्या बापाने भावाची मदत घेऊन खून केला
जलगाव गुन्हा: रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मुलगा दारु पिऊन सातत्याने कुटुंबियांना मारहाण करत होता. रील स्टार मुलाला वैतागलेल्या माजी सैनिक असलेल्या बापाने आणि त्याच्या भावाने मिळून त्याची गळा दाबून हत्या केलीये. जन्म दात्या पित्याने आपल्या भावाच्या मदतीने गळफास देऊन हत्या केल्याची घटना पोलिस तपासात समोर आली आहे. या घटनेत रील स्टार विकी पाटील याच्या हत्येनंतर त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक आपल्या पत्नी आणि सून मुलाच्या समवेत गेल्या अनेक वर्ष पासून राहत आहेत. त्याचा मुलगा विकी हा सोशल मिडियात रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता,याच दरम्यान त्याला दारूचे व्यसन लागलं. दारूच्या नशेत तो आपल्या वडिलांना मारहाण करू लागल्याने ,त्याचे आई वडील त्याला चांगलेच कंटाळले होते. अशातच 25 फेब्रुवारी रोजी देखील विकीने मोठ्या प्रमाणात मद्यपान करून आपल्या वडीलांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर वडिलांनी आपल्या भावांच्या मदतीने आपला मुलगा विकी याची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह गावालगत असलेला धरणाच्या ठिकाणी पुरून टाकला होता.
मुलाच्या हत्येनंतर बैचेन झालेल्या विठ्ठल पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. आत्महत्या पूर्वी विठ्ठल पाटील यांच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपण आपल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरला असल्याचं लिहिलं होतं. पोलिसांनी या चिठ्ठीचा आधार घेत तपास केला असता विकीचा मृतदेह धरणाच्या ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेत पोलिसांनी अधिकचा तपास केला असता, विकीची गळा दाबून हत्या करण्यामध्ये त्याचे वडील विठ्ठल पाटील आणि त्यांचे बंधू आणि जेसीबी चालक यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या सगळ्याच्या विरोधात एरंडोल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखला करून त्यांना अटक केली आहे.
विकीच्या त्रासाला कंटाळून आपले पती विठ्ठल पाटील यांनीच त्याची हत्या केल्याचं विकीची आई आणि विठ्ठल पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील यांनी म्हटलं आहे. विकीची आई संगीता पाटील यांच्या विरुद्ध मत विकीची पत्नी पायल यांनी व्यक्त केले आहे. आपले सासरे विठ्ठल पाटील यांना आपल्या शर्टाची बटण देखील लावता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीची हत्या केली हे आपल्याला पटत नाही. या घटनेत त्यांनी आपले चुलत सासरे यांच्या परिवाराचा हात असल्याचं सांगत,ज्यांनी आपल्या पतीला मारले त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि आपल्या पतीला न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.