मोठी बातमी – केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, लाखो रुपयांची रोकड लुटली

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून चोऱ्या, घरफोडी, खून, बलात्कार, दरोडेखोरीचं सत्र सुरू आहे. सर्वसामान्य जनता यामुळे बेजार झालेली असतानाच आता केंद्रीय मंत्रीही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. बंदुकीचा धाक दाखवत पाच दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील लाखो रुपयांची रोकड लंपास केली. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले असून पाच पैकी तीन दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केल्याचीही माहिती मिळतेय.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.