जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्यानं गाठली नवी उंची; दसऱ्याच्या तोंडावर खरेदीचा ट्रेंड कसा?
सोन्याचे दर आज जल्गाव: दसरा आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला अनेक जणांची पसंती सोने खरेदीला असली तरी सोन्याचा 10 ग्रॅमच्या भावाने पुन्हा उसळी मारली आहे. सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून, 24 तासांतच सुवर्णदरात जवळपास दोन हजार रुपयांने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचा दर आता 1,17,200 रुपयांवर पोहोचला असून, जीएसटीसह हा दर 1,20,700 रुपयांपर्यंत गेला आहे. यामुळे सामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे आता अवघड होऊन बसले आहे. त्यामध्ये अनेक ग्राहक ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. (Jalgaon Gold Market)
सोने खरेदीचा ट्रेंड कसा राहील?
जळगावातील हाऊस ऑफ ज्वेल्सचे संचालक सुनील बाफना म्हणाले, “ सोन्याच्या दरात 24 तासात जवळजवळ 1500 ते 1700 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव 1,17,200 रुपये झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,20,700 रुपयांवर गेला आहे. जागतिक अर्व्यवस्थेतील परिस्तितीमुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. वर्ल्ड बँक, चायना मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धरणामुळेही अनिश्तितता वाढली आहे. अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार सोने खरेदी करताना दिसून येत आहेत . ग्राहकांचा सोने खरेदीचा ट्रेंड पाहता, ज्यांना तातडीने सोने खरेदी करायची आहे असेच लोक सोने खरेदी करताना दिसत आहेत. सूट मिळण्याच्या आशेने अनेक जण खरेदी करण्यासाठी थांबलेले आहेत. सणावाराच्या पार्श्वभूमीवर काहीजण खरेदी करत असल्याचं सुनील बाफना म्हणाले.
शिवाय दोन दिवसांवर दसरा आला आहे. या कालावधीत अनेक जण सोने खरेदी करताना दिसून येतात. याचाही परिणाम सोने खरेदीवर निश्चित दिसेल. नोकरदार आणि व्यापारी वर्ग सोने खरेदी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यांना 5 ग्रॅम 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचा आहे ते खरेदी करत आहेत.
सोन्याच्या दरात वाढ कशामुळे?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर लावलेल्या टेरीफ रेट धोरणामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात चीनसह अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी सुरू केले. यामुळे जागतिक स्तरावर सोन्याची मागणी वाढली आणि स्थानिक बाजारातही दर दिवसेंदिवस वाढत आहेत.
सोने खरेदी आवाक्याबाहेर, ग्राहक म्हणाले…
ग्राहकांनीही या वाढत्या दरांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नयना टिकारे म्हणाल्या, “सोन्याचे दर इतके वाढले की, सध्या खरेदी करणे धाडसाचे ठरेल. आम्ही घरून विचार करून आलो होतो कि आपल्या बडेटनुसार सोनं घेऊया. पण भाव पहिले तेंव्हा आम्हाला आधी चर्चा करावी लागली. एवढे भाव झाले आहेत त्यामुळे मन मरावं लागतंय.” अशी प्रतिक्रिया ग्राहक वैशाली महाजन यांनी दिली आहे.
निशा शिंदे आणि गणेश सोनवणे यांनीही सांगितले की, “सोन्याचे भाव एवढे वाढले आहेत. आता दसरा आहे. पुढे लग्नसराई सुरु होईल. सर्वसामान्यांना सोनं घेणं कठीण झालं आहे ”सध्या सोन्याचे वाढलेले दर सामान्य ग्राहकांच्या बजेटच्या बाहेर गेले असल्यामुळे, खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी वेट अँड वॉच अशी भूमिका स्वीकारली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक आणि स्थानिक आर्थिक परिस्थिती पाहता, सोन्याचे दर अजून बदलत राहतील आणि ग्राहकांनी खरेदीत सतर्कता ठेवणे आवश्यक आहे.
आणखी वाचा
Comments are closed.