Jalgaon Honor Killing : CRPF च्या माजी अधिकाऱ्याकडून गरोदर मुलीचा खून, पहिल्यांदा गरोदर असताना करायला लावला गर्भपात

जळगावमध्ये CRPF चे माजी अधिकारी किरण मंगलेने मुलीचा गोळ्या घालून खून केला होता. ती मुलगी तीन महिन्यांची गरोदर होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर मंगले याने आपल्या मुलीला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला होता.
हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. तृप्ती मंगलेने आई वडिलांच्या इच्छेविरोधात अविनाश वाघ याच्याशी लग्न केले होते. म्हणून तृप्तीचे वडिल किरण मंगले याच्या मनात राग होता. अविनाश वाघ याची बहीण संस्कृती वाघचे लग्न ठरले होते. संस्कृतीची हळद सुरू असताना किरण तिथे आपला मुलगा निखिलसोबत तिथे आला आणि किरणने मुलगी तृप्ती आणि जावई अविनाशवर गोळ्या झाडल्या. त्यात तृप्तीचा जागेवरच मृत्यू झाला. अविनाशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धक्कादायक म्हणजे तृप्ती तीन महिन्यांची गरोदर होती. इतकंच नाही तर तृप्ती लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा गरोदर होती तेव्हा किरणने तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लागवा. तृप्तीच्या सासू प्रियंका वाघ म्हणाल्या की तृप्ती आणि अविनाशचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यात तृप्ती गरोदर राहिली. तेव्हा किरण तृप्तीच्या सासरी आला आणि माफी मागायला लागला. किरण तृप्तीला माहेरपणासाठी घरी नेले. पण तिथे किरणने तृप्तीवर गर्भपात करायला दबाव आणला आणि तिने गर्भपात केला. त्यानंतर तृप्तीने तिथून कसाबसा पळ काढला आणि सासरी निघून आली.
तृप्तीच्या सासू प्रियंका वाघ यांनी सांगितले की जेव्हा प्रियंकाला गोळ्या घातल्या तेव्हा ती तीन महिन्यांची गरोदर होती. तृप्तीच्या मृत्यूनंतर वडिल किरण मंगलेला पोलिसांनी अटक केली. पण तृप्तीच्या आईने तिचा मृतदेहही ताब्यात घेण्यास नकार दिला. तेव्हा तृप्ती माझ्या मुलीसारखीच होती असे म्हणत तिच्या सासू प्रियंका वाघ यांनी तृप्तीवर अंत्यंसस्कार केले.
Comments are closed.