उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर जळगावात महायुतीची घोषणा, कोण किती जागा लढवणार?
जळगाव : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. दरम्यान, या निवडणुकीसाठी काही ठिकाणी युत्या तर काही ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत. तर कुठं स्वबळावर देखील निवडणूक लढवली जात आहे. दरम्यान, जळगावात महायुतीची अधिकृत घोषणा, करण्यात आला आहे. जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालं आहे. आमदार सुरेश भोळे यांनी महायुतीची अधिकृत घोषणा केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर जळगावात महायुतीची रात्री आठ वाजता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
कोणता पक्ष किती जागा लढवणार?
जळगावात काही दिवसापूसन युती होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज जळगावात महायुतीची घोषणा झाली आहे. भाजप 46, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 6, शिवसेना (शिंदे गट) 23 जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवारांची आयात-निर्यात करण्यात आली आहे. उमेदवारीवरून भाजपात नाराजी असून ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
भाजपामध्ये उमेदवाराीवरुन नाराजी
उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी संपल्यानंतर जळगावात रात्री महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. आमदार सुरेश भोळे यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत महायुतीची घोषणा करत जागावाटपाची माहिती दिली. महायुतीत भाजपाला 46, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 6 तर शिवसेना (शिंदे गट) 23 जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये आयात-निर्यात झाल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजपामध्ये सुमारे 498 इच्छुक उमेदवार होते, त्यापैकी 46 जणांना उमेदवारी मिळाल्याने काही प्रमाणात नाराजी असल्याचे मान्य करत, ही नाराजी स्वाभाविक असून ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार भोळे म्हणाले. तसेच कौटुंबिक चर्चेनंतर पत्नीची उमेदवारी मागे घेऊन मुलाला उमेदवारी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जळगावकरांसमोर विकासाचे मुद्दे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची केवळ शिवसेना शिंदे गटासोबत सोबत युती झाली होती. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससोत युती होणार की नाही याबाबत स्पष्टता नव्हती. पण अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याशी चर्चा पूर्ण झाल्यानंतर युती झाली आहे. त्यामुळं जळगाव पालिकेच्या निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या:
निकालाआधीच भाजप उघडणार विजयाचं खातं, कल्याण डोंबिवलीत रेखा चौधरींची बिनविरोध निवड होणार
आणखी वाचा
Comments are closed.