वन्य प्राण्यांपासून संरक्षणाचा प्रयत्न ठरला जीवघेणा, विजेच्या कुंपणाचा धक्का लागून पाच जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावामध्ये शेतातील तारेच्या कुंपणाला विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

एरंडोल तालुक्यातील वारखेडी शिवारात मसाज रोडकरील गट क्रमांक 21 मध्ये एक शेत आहे. मध्य प्रदेशातील एक कुटुंब या शेतात काम करण्यासाठी आले होते. हे कुटुंब गेल्या अनेक महिन्यांपासून शेतात राहत होते. या कुटुंबात दोन महिला, एक 42 वर्षीय पुरुष आणि तीन मुले होती. आज महेशचे कुटुंब शेतात जात असताना त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. दुर्दैवाने या धक्क्यात दोन 40 वर्षीय महिला, एक 45 वर्षीय पुरुष, एक 6 वर्षीय मुलगी आणि एक 8 वर्षीय मुलगा यांचा मृत्यू झाला. तर दीड वर्षाची दुर्गा किकास पावर ही चिमुकली या घटनेतून बचावली आहे.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली व पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह शककिच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत आणि शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे.

Comments are closed.