जालन्यातील लाचखोर आयुक्तास कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला


जालना : महापालिका आयुक्तांना चक्क 10 लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता, जालन्यातील महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर  याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून न्यायालयाकडे जामीनासाठी केलेला अर्ज कोर्टाने (Court) फेटाळून लावला आहे. त्यामुळे, जालना (Jalna) महापालिका आयुक्त महोदयांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. एका कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महपालिका आयुक्तांना एसीबीने अटक केली होती. त्यानंतर, त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले होते.

दोन दिवसापूर्वी कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून आयुक्त खांडेकरला अटक केली होती. या प्रकरणी आरोपी खांडेकरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, आज अंबड येथील सत्र न्यायालयाने खांडेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, आयुक्त महाशयांनी तात्काळ आपला जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, अंबड न्यायालयाने आरोपी लाचखोर आयुक्तांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. तक्रारदाराकडून कामाचे बिल पास करण्यासाठी तब्बल 10  लाख रुपयांची लाच देण्याची मागणी खांडेकर यांनी केली होती. यावेळी शासकीय निवासस्थानी 10 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ त्यांना पकडले होते. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. संतोष खांडेकर यांच्या घराची देखील झाडाझडती घेण्यात आली आहे. या घटनेनं जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

आयुक्तांना अटक होताच  फोडले फटाके

जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या अटकेनंतर जालन्यात कंत्राटदारांनी जालना एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला. जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी  बांधकामाचे बिल देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा लाखाची लाच मागितली होती, यावेळी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक केलं. यानंतर काही कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला, तसेच एसीबी अधिकाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा

आधी 4, आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला? मंत्री जयकुमार गोरेंचे ऑपरेशन लोटस

आणखी वाचा

Comments are closed.