जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घड
जालना महानगरपालिका निवडणूक जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. जालना शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. प्रभाग क्रमांक 10 मधील मिलन चौक परिसरात विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत 6 ते 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय उमेदवाराच्या मिरवणुकीत राडा
मिळालेल्या माहितीनुसार , काँग्रेसच्या विजयी उमेदवार अन्सारी फरहाना अब्दुल रऊफ यांच्या समर्थकांनी विजयाच्या आनंदात मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक मिलन चौकात पोहोचताच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दोन्ही गटांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी सुरू झाली.
या गोंधळात दोन्ही बाजूंचे मिळून सहा ते जण गंभीररीत्या जखमी झाले, तर काहींना किरकोळ दुखापती झाल्या. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,” काल (16 जानेवारी) साडेपाच वाजेच्या सुमारास मिलन चौकामध्ये दोन गटांमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे.
65 जागा 454 उमेदवार..
महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत 16 प्रभाग 65 जागा आणि 454 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. जालना शहरात 291 केंद्रांवर गुरुवारी (15 जानेवारी 2026) मतदान प्रक्रिया पार पडली. युतीचे प्रस्ताव फिस्कटले. बैठकांचा सिलसिला थांबला. पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडू नये यासाठी भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते मात्र, जालना महानगरपालिकेत (Jalna municipal corporation election) भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचा जाहीर झाल्याने राजकीय समीकरणे बदलली होती.
आणखी वाचा
Comments are closed.