जालन्यात गॅस एजन्सीच्या गोदामातून सिलेंडर चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोदामातून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ही चोरी केली. गोदाम बंद असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चोरीत एकूण 11 गॅस सिलेंडर चोरून नेण्यात आले असून, त्यामध्ये 96 घरगुती सिलेंडर, 12 निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलो वजनाचे 2 सिलेंडर यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. चोरी झालेल्या सिलेंडरची एकूण किंमत अंदाजे 4 लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एकीकडे नागरिकांना गॅसचा तुटवडा जाणवत असताना अशी चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणी गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आव यांनी मसपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी एजन्सी बंद असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाली असावी. सोमवारी सकाळी गोदाम उघडताना हा प्रकार उघडकीस आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments are closed.