गोठ्यात सुरू होता गर्भपाताचा उद्योग, जालन्यात गुन्हे अन्वेशन विभागाची मोठी कार्यवाही, दोन आरोपींसह तीन महिलांना रंगेहात पकडले

वर्षभरापूवी याच भोकरदन शहरामध्ये अवैध गर्भपाताचे स्कॅन्डल उघड झाले होते.यात अनेक दिग्गज डॉक्टर गजाआड झाले असताना आजपावेतो कोठेही गर्भपात होत नसल्याची भावना नागरिकांच्या मनात असतांना आज २६ नोहेंबर बुधवार रोजी गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त माहिती मिळाल्यानुसार सदर गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचुन पथक तयार करत सुमारे सायंकाळी सहा वाजेदरम्यान जालन्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा शिवारातील गवळीवाडी येथील समाधान विठ्ठल सोरमारे यांच्या शेतातील बकऱ्यांच्या गोठ्यातच गर्भपात सुरू असतांना त्यांना या पथकाने रंगेहात पकडले.
यावेळी आरोपी डॉ. केशव हरीभाऊ गावंडे (४९) व्यवसाय (पॅथालॉजी लॅब )सराफा गल्ली, भोकरदन,सतिष बाळु सोनुने (३२ ) ह. मु. जाधववाडी, संभाजीनगर यांच्यासह गर्भपात करण्यासाठी आलेल्या तीनही महिलांना ताब्यात घेण्यात आल्या असून यावेळी गर्भपातासाठी लागणारे साहित्य देखील हस्तगत करण्यात आले आहे. यात पोर्टेबल वायरलेस सोनोग्राफी प्रुफ, मोबाइयल ॲप्लीकेशन व दोन मोबाईल व गर्भपाताच्या गोळ्या इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
डॉ. विजय वाकुडे, ॲड. सोनाली कांबळे, डॉ. वायाळ, डॉ.कृष्णा वानखेडे, डॉ. मनोज जाधव, मयुर गिराम,स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Comments are closed.