मुलीने आंतरधर्मीय लग्न केल्याचा राग, माहेरच्यांनी घरी बोलावून नातवासह साखळदंडाने बांधलं, दोन मह

जालना: जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे घरच्यांनी मुलीला साखळ दंडाने घरात बांधून डांबून ठेवल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ही घटना आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून विवाहितेची सुटका करण्यात आली आहे. भोकरदन तालुक्यातील आलापुर   गावात आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या आई-वडिलांनी मुलीसह तिच्या 4 वर्षाच्या मुलाला साखळदंडांनी घरातच दाबून ठेवल्याचं उघड झालं आहे.

बहिणीला भेटण्यासाठी माहेरी गेली अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या बहिणीला भेटण्यासाठी माहेरी गेलेल्या या महिलेस घरच्यांनी घरात कोंडून ठेवलं होतं, पूर्वीच्या कौटुंबिक कलाहामुळे पतीने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचे पीडित महिलेला हजर करण्याचे आदेश दिले असता, माहितीनुसार पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली. त्यावेळी सदर महिला साखळदंडात बांधल्याचं निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी सदर विवाहितेला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजी नगर येथील तिच्या पतीच्या स्वाधीन केलं आहे.

पायात दोन कुलपाने बंद केलेला साखळदंड बांधून दोन महिने घरात डांबून ठेवलेल्या विवाहितेची पोलीस उपनिरीक्षक बीटी सहाणे व महिला पोलीस कर्मचारी संध्या देठे यांनी आलापुर भागातून सुटका केली. शहणाज उर्फ सोनल व मुलगा सागर असे त्यांचे नावे आहेत, त्या दोघांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत तिचा पती सागर ढगे यांच्या स्वाधीन केले आहे.

नेमकं काय घडलं?

मुलीने अंतर धर्मीय विवाह केला या रागातून तिच्या आई-वडिलांनी तिला माहेरी बोलावून घेतले. ती माहेरी आल्याानंतर घरातच दोन कुलपासह पायात साखळ दंड बांधून तिला गेल्या दोन महिन्यापासून घरात ठेवले होते. या प्रकरणी त्या महिलेच्या पतीने संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. न्यायालयाने तात्काळ दखल घेऊन पोलिसांना तिची सुटका करण्याचे आदेश दिले.

भोकरदन शहराच्या जवळच असलेल्या आलापुर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिने त्यांचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथील मिसारवाडीमध्ये राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला. यानंतर शहा कुटुंबीय आलापुर येथे परत आपल्या मूळ गावी आले. शहनाजला तीन वर्षाचा कार्तिक नावाचा मुलगा आहे. दोन महिन्यापूर्वी शहनाज हिच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ बघण्याच्या कारणाने तिच्या आईने तिला व तिचे पती सागर यांना आलापूर येथे बोलावून घेतलं होतं.

ते दोघे घरी आल्यानंतर शहनाज व तिचा मुलगा कार्तिक यांना तिच्या आई-वडिलांनी घरी ठेवून घेतले. पती सागर याला घरातून हाकलून दिलं. यानंतर 7 डिसेंबर रोजी सागर पुन्हा त्याच्या पत्नीला घेण्यासाठी सासरी गेल्यानंतर तुझा आमचा धर्म वेगळा आहे. आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात दुसरं लग्न लावून देणार आहे, असं म्हणत सागर याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन हाकलून दिलं. मात्र, यानंतर 24 डिसेंबर रोजी शहनाजच्या बहिणीने सागरला फोन करून सांगितले की, शहनाज व तिच्या मुलाला तिच्या आई-वडिलांनी जबरदस्तीने घरात पायाला साखळ दंड बांधून कुलूप लावून डांबून ठेवले आहे, त्यांच्या जीवाला देखील धोका आहे. त्यानंतर सागरने छत्रपती छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेऊन त्याच्या पत्नीची व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना आदेश दिले. त्यानंतर शहनाज व तिचा मुलगा कार्तिक यांची सुटका झाली.

छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन आदेश दिल्याने हे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. मात्र खालिद शहा यांच्या कुटुंबाचा फारसा कोणाशी संबंध नव्हता. त्याचबरोबर ते मनोरुग्ण असल्यासारखे वागत असल्याने या कुटुंबाविषयी अथवा शहनाज विषयी कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. मात्र गोपनीय पद्धतीने माहिती जमा करून आम्ही डांबून ठेवलेल्या घरातून विवाहिता शहनाज व तिचा मुलगा कार्तिक या दोघांची सुटका केली, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक बी.टी. सहाणे यांनी दिली आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.