Jalna News – तीन मुलांच्या आईचे 24 वर्षीय तरुणावर प्रेम जडले, कुटुंबाच्या विरोधामुळे जोडप्याने जीवन संपवले

प्रेम प्रकरणातून एका जोडप्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील वालसावंगीत घडली आहे. मयत महिला तीन मुलांची आई आहे तर तरुण अविवाहित आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश उत्तम वाघ (24) आणि जयाबाई पांडुरंग गवळी (38) अशी मयत जोडप्याची नावे आहेत. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश आणि जयाबाईचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांना लग्न करायचे होते. पण घरच्यांचा प्रखर विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. जालन्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील वाढोनाजवळ असलेल्या कालिंकामाता मंदिर परिसरातील डोंगर पर्वतरांगामध्ये असलेल्या सागाच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केली.

प्रकरणाचा सखोल पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी दिपक गवळी यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक जायभाये व पो.काँ.सुरेश पाटील हे करत आहे. तपासाअंती आत्महत्येचे नेमके कारण कळेल.

Comments are closed.