Jalna News – मुसळधार पावसात झाडाचा घेतला आसरा… तिथेच झाला घात; वीज कोसळून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील विज्ञानेश्वर आपेगाव येथे महादेवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक अवकाळी पाऊस व विजेच्या गडगडाट सुरू झाला. त्यावेळी दोन तरुणांनी झाडाचा आसरा घेतला असता त्यांच्यावर वीज कोसळून दोघेही जागीच ठार झाले. या दुर्घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री 7.30 ते 8 च्या दरम्यान महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती या ठिकाणी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली आहे.

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील तरुण गोविंद प्रल्हाद लहाने (21), आदित्य दगडू बेद्रे (20) दोघेही रा. महाकाळा असे मृतांचे नावे आहेत. आज सोमवार असल्याने गोविंद प्रल्हाद लहाने, आदित्य दगडू बेद्रे हे विज्ञानेश्वर आपेगाव येथे महादेवाच्या दर्शनासाठी जात असतांना अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने लिंबाच्या झाडाखाली थांबले असता लिंबाच्या झाडावर वीज कोसळून दोन तरुण ठार तर एक जण गंभीर भाजला. हे तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. यातील जखमीचे नाव कळू शकले नाही .

Comments are closed.