टी20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी! 'या' स्टार खेळाडूने कर्णधार म्हणून रचला नवा इतिहास

जेम्स व्हिन्स टी 20 रेकॉर्ड: आज (20 ऑगस्ट) रोजी टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा रेकाॅर्ड मोडला गेला, ज्यात इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जेम्स विन्सने ‘द हंड्रेड’ मध्ये खेळताना नवा इतिहास रचला. कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो आता जगातील पहिला खेळाडू बनला आहे. (Most runs as T20 captain) विन्सने हा रेकाॅर्ड ‘द हंड्रेड’ स्पर्धेत सदर्न ब्रेव्ह आणि वेल्स फायर यांच्यातील कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात केला. विन्सने 26 चेंडूंमध्ये 29 धावांची खेळी करून फाफ डू प्लेसिसला मागे टाकले.

34 वर्षीय जेम्स विन्सला टी20 क्रिकेटमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. ‘द हंड्रेड’ च्या या हंगामात तो सदर्न ब्रेव्ह संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड यापूर्वी फाफ डू प्लेसिसच्या नावावर होता. (James Vince vs Faf du Plessis) त्याने हा रेकाॅर्ड जुलै महिन्यात मेजर लीग क्रिकेटमध्ये विराट कोहलीला मागे टाकून केला होता. आता या यादीत विन्स 6,663 धावांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, आणि त्याला डू प्लेसिसपेक्षा धावांचे अंतर आणखी वाढवण्याची संधी आहे.

टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (टी -20 कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करतात)
जेम्स विन्स – 6,663 धावा (206 डावात)
फाफ डू प्लेसिस – 6,634 धावा (203 डावात)
विराट कोहली – 6,564 धावा (188 डावात)
एमएस धोनी – 6,283 धावा (289 डावात)
रोहित शर्मा – 6,064 धावा (224 डावात)

इंग्लंडचा खेळाडू जेम्स विन्स जगभरात होणाऱ्या विविध टी20 लीगमध्ये खेळताना दिसतो. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 449 सामने खेळले असून, 437 डावांमध्ये फलंदाजी करताना 32.11च्या सरासरीने 12,557 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 7 शतकांसह 80 अर्धशतके झळकावली आहेत. विन्सचा स्ट्राइक रेट 135.82 इतका आहे. (James Vince career stats)

Comments are closed.