हातात हात, चेहऱ्यावर ग्लो; लंडनच्या रस्त्यांवर बॉयफ्रेंडसोबत गुटरगू करताना दिसली जान्हवी कपूर, चाहत्यानं गुपचूप काढला व्हिडीओ

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आणि लाखो चाहत्यांचा क्रश असलेल्या जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती उद्योजक शिखर पहाडिया याच्यासोबत लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसतेय. जान्हवी सध्या शिखर पहाडिया याला डेट करत असून अनेकदा दोघे सोबत दिसले आहेत. आताही लंडनच्या रस्त्यावरील त्यांचा एक व्हिडीओ चाहत्याने चित्रित करून व्हायरल केला आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सध्या दोघेही यूकेमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहेत. आता दोघांचा लंडनमधील एक व्हिडीओही समोर आला आहे. यात जान्हवी शिखरचा हात पकडून चालताना दिसतेय. तसेच जान्हवीसोबत तिची बहीण खुशी कपूरही यात त्यांच्यासोबत चालताना दिसत आहे.

जान्हवी आणि शिखर जुने मित्र आहेत. किशोरावस्थेत असतानाही ते एकमेकांसोबत होते, परंतु नंतर दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकत्र आले आहेत.

Comments are closed.