चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. रिपोर्टनुसार, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बेड रेस्टवर राहावं लागणार आहे. बुमराह आता कधी खेळेल, याचा निर्णय त्याच्या पाठीची सूज बरी झाल्यानंतरच घेतला जाईल. बुमराह गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशी परतला, ज्यामध्ये पाच कसोटी सामने खेळले गेले होते.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जाईल, परंतु त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. याशिवाय, बुमराहच्या पुनरागमनाबाबत कोणतीही घाई केली जाणार नाही. त्याला सध्या घरी आराम करण्यास सांगण्यात आलंय. अहवालात सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, “बुमराह पुढील आठवड्यापर्यंत सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जाऊ शकतो, परंतु अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. त्याला घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आलाय जेणेकरून त्याचे स्नायू बरे होतील आणि सूज कमी होईल. एकदा ते झालं की, भविष्यातील मार्ग ठरवला जाईल. बेड रेस्ट ऐकायला चांगलं वाटत नाही. आशा आहे की हे डिस्क बल्ज किंवा स्नायूंची सूज नसावी. मात्र त्याला देण्यात आलेल्या बेड रेस्टवरून दुखापत गंभीर असल्याचं दिसून येतं.”
जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहला पाठीचा त्रास झाला आणि तो सामन्याच्या मध्यभागी स्कॅनसाठी रुग्णालयात गेला. बुमराहनं दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही, ज्यामुळे त्याची समस्या गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. नंतर वृत्त आलं की बुमराहला पाठीच्या दुखण्याचा त्रास होत आहे.
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधील लीग स्टेज सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. टीम इंडियानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तरच तो खेळू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
हेही वाचा –
बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केलने सर्वांसमोर बोलणे खाल्ले, ऑस्ट्रेलियात भयंकर चिडला होता गौतम गंभीर!
रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? बीसीसीआयनं काय निर्णय घेतला?
आकाश चोप्रांनी भारतीय खेळाडूंना फटकारले, बीसीसीआयच्या या निर्णयाचं समर्थन
Comments are closed.