बुमराहकडे सुवर्णसंधी! भुवनेश्वरचा टी20 रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त एक विकेटची गरज

टी20 आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय व्होलटेज सामना क्रिकेट चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या सामन्यात भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भुवनेश्वर कुमारच्या टी20 इंटरनॅशनल रेकॉर्डला मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्या बुमराह 71 टी20 सामन्यात 90 विकेट्स घेतल्या असून भारतीय गोलंदाजांमध्ये चौथ्या स्थानी आहे. जर त्याने पाकिस्तानविरुद्ध फक्त एक विकेट घेतली, तर भुवनेश्वर कुमारला यादीत पाचव्या स्थानी ढकला जाईल. भुवीने 87 सामन्यात 90 विकेट्स मिळवल्या असून तो नोव्हेंबर 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेला नाही.

भारतासाठी सर्वाधिक टी20 विकेट्सचा रेकॉर्ड अर्शदीप सिंगकडे आहे. 63 सामन्यात त्याने 99 विकेट्स मिळवल्या आहेत आणि पाकिस्तानविरुद्ध फक्त एक विकेट घेऊन नवीन टप्पा गाठण्याची संधी आहे. यादीत दुसऱ्या स्थानी अनुभवी लेग स्पिनर युझवेंद्र चहल आहे, ज्याने 80 सामन्यात 96 विकेट्स मिळवल्या आहेत, परंतु तो सध्या भारतीय संघाचा भाग नाही आणि त्याने शेवटचा सामना ऑगस्ट 2023 मध्ये खेळला.

तिसऱ्या स्थानी स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आहे. 115 टी20 सामन्यात त्याने 94 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक सध्या आशिया कपसाठी भारतीय संघात आहे, मात्र यूएईविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही. या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट होते की भारताच्या सामन्यातील गोलंदाजांचा फॉर्म आणि रेकॉर्ड मोडण्याची संधी सामन्याची कसोटी ठरेल. जसप्रीत बुमराहसारख्या धाकड गोलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल आणि हा सामना टी20 क्रिकेटमध्ये रेकॉर्डसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Comments are closed.