'मला हसायला आले…', विश्रांतीच्या बातम्यांवर जसप्रीत बुमराहची मोठी प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सिडनीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाठीच्या कण्यातील समस्येमुळे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुढे गोलंदाजी करू शकला नाही. यानंतर, सर्व चाहते त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच तो कधी मैदानात परतू शकेल याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर, बुमराह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळू शकेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुमराहने त्याच्या दुखापतीबाबत आलेल्या काही खोट्या बातम्यांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

जसप्रीत बुमराहबद्दल अशा अनेक बातम्या आल्या होत्या की त्याला बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला आहे. ज्याबाबत बुमराहने आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले आहे की, मला माहित आहे की खोट्या बातम्या वेगाने पसरतात, परंतु हे वाचून मला हसायला आले. सूत्र विश्वसनीय नाही. बुमराहच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही माहिती समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही हे अधिकृत विधान आल्यानंतर किंवा स्पर्धेसाठी संघ जाहीर झाल्यानंतरच ठरवले जाईल. ज्यावर सर्व चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहची अद्भुत कामगिरी दिसून आली. ज्यामध्ये संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाज त्याच्याविरुद्ध संघर्ष करताना स्पष्टपणे दिसले. अशा परिस्थितीत त्याचा सध्याचा फॉर्म खूपच चांगला आहे. बुमराह टीम इंडियाचा पुढचा कसोटी कर्णधार बनण्याच्या शर्यतीतही आघाडीवर आहे. ज्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थ आणि सिडनी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही स्वीकारली होती.

हेही वाचा-

Kho Kho WC 2025; टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक, पेरुवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत धडक
संघाला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर पडला ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज
Champions Trophy; भारतीय संघाच्या घोषणेसाठी एवढा वेळ का? माजी क्रिकेटपटूने साधला निशाना

Comments are closed.