Jaswinder Bhalla – प्रसिद्धी विनोदी कलाकार जसविंदर भल्ला यांचे निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध विनोदी कलाकार डॉ. जसविंदर भल्ला यांचे निधन झाले आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर 23 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती मोहालीचे उपमहापौर कुलजीत सिंग बेदी यांनी दिली.

जसविंदर भल्ला यांचा जन्म 4 मे 1960 रोजी लुधियाना जिल्ह्यातील दोराहा येथे झाला होता. ते पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक देखील होते. त्यांनी 1988 मध्ये ‘छनकटा 88’ या चित्रपटातून विनोदी कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘दुल्ला भट्टी’ चित्रपटातही काम केले. ‘छंकार्टा’ या विनोदी सिरीजसह त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या होत्या.

Comments are closed.