Jawan went on duty on the third day of the wedding
जळगावच्या मनोज पाटील याचे यामिनी हिच्याशी 5 मे रोजी लग्न झाले. तर, 7 मे रोजीच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या. त्यामुळे त्याला ड्युटीवर जावे लागले.
(India Pakistan War) जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला धडा शिकवला. पण असे अनेक फटके खाऊन सुधरेल तो पाकिस्तान कसला? त्यांनी मुजोरी दाखवत भारतावरच ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरू केले आहेत. भारतीय लष्कराकडून हे हल्ले यशस्वीरीत्या परतवले जात असून पाकिस्तानवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीत सर्व भारतीय जवानांच्या सु्ट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत जळगावमधील पाटलाच्या बहादूर सुनेने लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच आपला ‘सिंदूर’ भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवला. (Jawan went on duty on the third day of the wedding)
सैन्य म्हणजे बलिदान, हे जरी खरे असले तरी भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातील लाडक्या मुलाला देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठविण्यासाठी मोठे काळीज लागते. त्याचाच प्रत्यय जळगावच्या पाचोरा तालुक्यातील ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबीयांना आला. त्यांचा मुलगा मनोज याचे लग्न रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी 5 मे रोजी झाले. तर, 7 मे रोजीच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या. त्यामुळे लग्नानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशीच मनोज पाटीलला ड्युटीसाठी निघावे लागले. विशेष म्हणजे, त्या दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा होती. मात्र, कर्तव्याला प्राधान्य देत तो ड्युटीसाठी रवाना झाला.
“देश की रक्षा के लिए अपना सिंदूर भेज रही हूं” ये कहना है महाराष्ट्र के मनोज पाटिल की पत्नी का..मनोज शादी के तीन दिन बाद ही जंग के लिए वापिस ड्यूटी पर लौट गए।
अभी तक फिल्मों में देखा था, नई नवेली दुल्हन भरी आंखों से अपने पति को जंग के मैदान में भारी मन से भेजती है।… pic.twitter.com/Kl2rbdoodP— Naina Yadav (@NAINAYADAV_06) May 9, 2025
मनोजचे कुटुंबीय त्याला निरोप देण्यासाठी रेल्वेस्थानकापर्यंत गेले होते. त्यातील प्रत्येकजण भावूक झाल्याचे दिसत होते. नववधू यामिनीचे डोळे पाणावल्याचे स्पष्टपणे दिसत होते. माझे पती सीमेवर चालले आहेत, याचा मला अभिमान आहे. देशासाठी आपले कुंकू सीमेवर पाठवत असल्याचे तिने सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी आपल्या भावनांना आवर घालून ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
हेही वाचा – India Pakistan War : 26 शहरांवर हल्ल्याचा पाकचा प्रयत्न उधळला, भारताने तीन हवाई तळांवर डागली क्षेपणास्त्रे
Comments are closed.