नव्याचे लग्न व्हावे असे मला वाटत नाही… जया बच्चन असं का म्हणाल्या

आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन पुन्हा चर्चेत आल्या आहेत. जया बच्चन यांनी एका इव्हेण्ट दरम्यान लग्न परंपरा आता आऊटडेटेड झाली असून मला नव्याचे लग्न व्हावे असे वाटत नसल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जया बच्चन असे का म्हणाल्या ते जाणून घेऊया.

जया बच्चन यांनी ‘वी द वुमन’शी गप्पा मारताना लग्नाच्या प्रश्नावर जीवनाचा आनंद घ्या असे म्हटले आहे. तर आजीच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या नव्याने लग्नानंतर करिअर सोडणं योग्य आहे का, यावर जया म्हणाल्या, मला नव्याचे लग्न व्हावे असे वाटत नाही. आजकालची मुले कोणालाही मागे टाकू शकतात. मी तिची आजी आहे आणि आता ती 28 वर्षांची होणार आहे. मी तरुण मुलांना लग्न करण्याचा सल्ला देण्यासाठी जुनी झाली आहे. वेळ बदलली आहे, आजची मुलं खुप हुशार आहेत. ती तुम्हाला मागे टाकतील. जया यांनी लग्नाची तुलना दिल्लीतल्या लाडूशी केली आहे. खाल्ले तरी त्रास आणि नाही खाल्ले तरी पश्चाताप असे म्हटले आहे. मात्र आपलं आयुष्य आनंदाने जगा असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

Comments are closed.